सातारा : इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी यासाठी 15 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2024 या कालावधीत तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या मेळाव्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून योजनांची माहिती करुन घ्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक संतोष जाधव यांनी केले आहे.
यशवंतराव चव्हाण इन्स्टीट्युट ऑफ सायन्स, सातारा येथे 16 ऑगस्ट, पंचायत समिती कार्यालय वाई येथे 19 ऑगस्ट, डी.पी.भोसले महाविद्यालय कोरेगाव येथे 20 ऑगस्ट, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय, कराड येथे 22 ऑगस्ट, पंचायत समिती फलटण येथे 24 ऑगस्ट, दहिवडी महाविद्यालय दहिवडी येथे 26 ऑगस्ट, पाटण पंचायत समिती कार्यालय येथे 28 ऑगस्ट, पंचायत समिती कार्यालय, मेढा येथे 30 ऑगस्ट, मध संचालनालय महाबळेश्वर येथे 31 ऑगस्ट, राजेंद्र कनिष्ठ महाविद्यालय खंडाळा येथे 2 सप्टेंबर व पंचायत समिती कार्यालय वडूज येथे 3 सप्टेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
