Explore

Search

April 19, 2026 10:09 pm

लेटेस्ट न्यूज़

Balochistan Firing :  बलूचिस्तानात ट्रक आणि बसमधून लोकांना उतरवून त्यांच्यावर बेछूट गोळीबार

आतापर्यंत 23 लोक ठार झाल्याची माहिती मिळाली 

मुसाखेल : पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील मुसाखेल जिल्ह्यात अत्यंत भयानक घटना घडली आहे. काही शस्त्र सज्ज लोकांनी ट्रक आणि बसमधून लोकांना उतरवलं. त्यांची ओळख पटवली व त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात आतापर्यंत 23 लोक ठार झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यावर पंजाब सरकारची रिएक्शन समोर आली आहे. मुसाखेलामध्ये पंजाब प्रांताच्या लोकांना टार्गेट करुन हा हल्ला करण्यात आला, असं पाकिस्तान सरकारच्या प्रवक्त्या आजमा बुखारी यांनी सांगितलं. याआधी एप्रिल महिन्यात नोशकी जवळ एक बसमधून नऊ यात्रेकरुना उतरवण्यात आलं. त्यांचं आयडी कार्ड तपासल्यानंतर गोळी मारुन त्यांची हत्या करण्यात आली होती.

मुसाखेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त नजीब काकर यांनी माहिती देताना सांगितलं की, “शस्त्रसज्ज लोकांनी सर्वसामान्यांवर फक्त गोळ्याच चालवल्या नाहीत, तर 10 गाड्यांना आग लावली” पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह रुग्णालयात नेण्यात येत आहेत. बलूचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या हत्याकांडाचा निषेध केला आहे. त्यांनी या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या.

rayatdarpan
Author: rayatdarpan

news

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy