Explore

Search

April 28, 2025 4:22 pm

लेटेस्ट न्यूज़

Satara News : जिहे-कठापूर योजनेसाठी 5409.72 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता

कोरेगाव तालुक्यातील 98 टक्के जमीन सिंचनाखाली; आमदार महेश शिंदे यांची माहिती

सातारा : गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेसाठी महायुती सरकारने 2022-23 च्या दरसूचीनुसार 5409.72 कोटी रुपयांच्या निवेदला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. नियामक मंडळाने या उपसा सिंचन योजनेचे कार्यक्षेत्र वाढवल्याने सातारा, कोरेगाव, माण, खटाव या चार तालुक्यातील 176 गावांचे 6004.37 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. ही योजना येत्या दीड वर्षात पूर्ण करावयाची आहे. कोरेगाव तालुक्यातील 98% क्षेत्र यामुळे सिंचनाखाली येणार आहे, अशी माहिती कोरेगावचे आमदार व कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी दिली.
तिसर्‍या प्रशासकीय मान्यतेनुसार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत दोन बॅरेजेस, तासगाव भाडळे नेर क्रमांक तीन नेर क्रमांक नेर क्रं चार रणसिंगवाडी शिरवली उत्तरमांड पश्चिममांड येथील आठ उपसा सिंचन योजनांचे काम तसेच ऊर्ध्वगामी नलिका क्रमांक तीन व चार आणि तीन थेट गुरुत्वीय नलिका यांचे काम होणार आहे. जिहे कठापूर बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. पंपगृह क्रमांक एक व दोन तीन पारेषण वाहिनी कोल्हापूर पद्धतीचे 32 बंधारे वर्धनगड बोगदा आंधळी बोगदा उध्र्वगामी नलिका, पहिली रांग इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. उर्ध्वगामी नलिका दुसरी रांग चे काम 40 टक्के पूर्ण झाले आहे नेर उपसा सिंचन योजना क्रमांक एक चे काम 30 टक्के योजना क्रमांक दोन चे काम 55 टक्के आणि आंधळी उपसा सिंचन योजनेचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. राज्यशासनाने अंदाजपत्रकात 2023-24 करता दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे, तर 2024 -25 करता 200 कोटीची तरतूद आहे.
गेल्या अडीच वर्षापासून या योजनेच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, 31 जानेवारी 2023 च्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रशासकीय प्रस्तावना तत्वतः मान्यता दिली होती. कृष्णा खोरे पाणी लवादाचे जादाचे पाणी या तालुक्यांना उपलब्ध होणार आहे. कृष्णा खोरे नियमक मंडळाच्या बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या योजनेमुळे खटाव तालुक्यातील 23 हजार हेक्टर, कोरेगाव तालुक्यातील 7500 हेक्टर, सातारा तालुक्यातील 2200 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे आणि सिंचन योजनेच्या तिसर्‍या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे हे शक्य झाले आहे. दोन महिन्यांमध्ये या योजनेचे काम सुरू होणार असून ही योजना दीड वर्षांमध्ये पूर्ण करावयाची आहे, असे महेश शिंदे यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भाने विरोधकांची सुरू होणारी टीका, कोरेगावातील रखडलेली विकास कामे यासंदर्भात महेश शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, विरोधक विरोधकांची काम करतात. टीका करणे हे त्यांचे कामच आहे. माझ्याकडूनही काही चुका होऊ शकतात. मी काही देव नाही. काही गोष्टींचे भांडवल करून विरोधक माझ्यावर टीका करत असतात. पण मी कामाला प्राधान्य देणारा माणूस आहे, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे चिन्ह लावून महेश शिंदे पत्रकार परिषदेला आले होते त्या विषयावर त्यांना छेडले असता ते म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीच्या काळात महायुतीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांचे काम करायचे ठरले होते. त्यानुसार आम्ही कमळ चिन्हाचा प्रचार केला. आता विधानसभा निवडणुकीत आता माझी वेळ आहे आणि मी शिवसेनेचा उमेदवार आहे. त्यानुसार पक्षाचा माणूस म्हणून मी धनुष्यबाण चिन्ह लावून आलो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझा उत्तम समन्वय आहे. ते मला लहान भावाप्रमाणे वागवतात. माझ्या कृष्णा खोरे महामंडळाच्या संदर्भातील अभ्यासपूर्ण मांडणीमुळेच मला उपाध्यक्ष पद मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy