दीपोत्सव साजरा करून उत्सवाची सांगता
सातारा : येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्री उत्सवातील ललिता पंचमी निमित्त मान्यवर कुमारिका तसेच सुवासिनी यांचे पूजन थाटात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मंदिरात आलेल्या या सर्व कुमारिका व महिलांना हळद, कुंकू लावून त्यांची पोटी भरण्यात आली. तसेच फळे आणि प्रसाद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
नटराज मंदिरात नवरात्री महोत्सवा अंतर्गत चंडी होम तसेच सप्तशती पाठाचे वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाले. वेदमूर्ती जगदीश शास्त्री भट्ट गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे पाठवाचन वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी व ब्रह्मवृंदांच्या हस्ते सहकारी गुरुजीनी हा चंडी होम नटराज मंदिरात संपन्न केला. समस्त जगामध्ये शांतता नांदावी, तसेच सर्वांना दीर्घायु आरोग्य लाभावे, सर्वांचे क्षेम, कल्याण व्हावे तसेच सर्वजण आनंदात, सुखात नांदावे असा प्रधान संकल्प करून सर्वांच्या कल्याणा हा चंडी होम मंदिरात देवीपुढे संपन्न करण्यात आला.
नटराज मंदिरात धार्मिक कार्यक्रमांत बरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम ही संपन्न होत असून मंदिरातील श्री उमादेवी ला दररोज विविध आसने तसेच अलंकार पूजा करण्यात येत होते. ललिता पंचमी निमित्त देवीला हत्तीवर बसलेले रूप देण्यात आले होते. मंदिरात या नवरात्री उत्सवामध्ये विजयादशमी दसऱ्यानिमित्त सकाळी 11 वाजता महापूजा केली. या उत्सव काळात उमादेवी विविध अलंकार पूजा दसऱ्या दिवशी भाज्यांचे अलंकार घालून शाकंभरी रूपातील पूजा केली.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नटराज नृत्यकला शाळेच्या ग्रुप सौ. आचल घोरपडे यांचे भरत नाट्यम द ब्ल्यू नोट गिटार क्लासेसचे गुरु प्रतीक सदामते व सहकलाकारांचे गिटार वादन संपन्न झाले.
Author: rayatdarpan
news



