साताऱ्यातील मुस्लिम समाज, जमियत ए उलेमा हिंद, आंबेडकरी चळवळीत सर्व संघटना, पुरोगामी विचारांचा संघनटना काश्मीरमधील आतंकवादी हल्ल्याच्या विरोधात सातारा कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन निषेधार्थ मोर्चा मध्ये सहभागी.
सातारा ; प्रतिनिधी ; जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला. ह्या हल्याचा निषेधार्त सातारा जिल्ह्यातील मुस्लीम समाज ,जमियत ए उलेमा हिंद, आंबेडकरी चळवळीत सर्व संघटना, पुरोगामी विचारांचा संघनटना काश्मीरमधील आतंकवादी हल्ल्याच्या विरोधात सातारा कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन आणि निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला .त्यात मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते .मोर्च्या नंतर जमियत ए उल्मा हिंद या संस्थे मार्फत जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात पहलगाम आतंकवादी हल्ल्याचा निषेध आणि ताबडतोब उत्तर देणेबाबत महोदय,
आम्ही आपणाकडे निवेदनाद्वारे निषेध नोंदवत आहोत आणि विनंती ही करत आहोत कि, गेल्या काही वर्षात भारत देशामध्ये आणि विशेष करून काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ल्याचे प्रमाण कमी झालेचे चित्र निर्माण झाले होते आ त्यामुळे देशात सर्वांनाच दिलासा मिळाला होता. दहशतवाद्यांनी भारत सरकारची धास्ती खाल्ली असल्याचे चित्र दिसत होते. काश्मीर मध्ये प्रचंड मोठे सैनिकी तळ आहे आणि केल्या गेलेल्या उपाययोजना यांच्या मुळे २०१९ नंतर काश्मीर मधील दहशतवाद संपला आहे असा विश्वास वाटत होता परंतु काल दि २२/४/२०२५ रोजी काश्मीर येथील पहलगाम भागात दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा भ्याड हल्ला, मानवतेवरील हल्ला, निंदनीय आणि संतापजनक हल्ला असून हया भ्याड हल्ल्याचा आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून, संस्थेच्या सदस्यांच्या वतीने आणि मुस्लिम समाजाच्यावतीने तिव्र शब्दात जाहीर निषेध करत आहोत.
पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा निषेध निषेध निषेध.
पहलगाम येथील हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या चालविल्याची बातमी वाचून सर्वांनाच वेदना झाल्या आहेत. हया निंदनीय कृत्याचाही निषेध आणि मृत व्यक्तीना आदरांजली. आम्ही आपणाकडे मागणी करत आहोत की हया हल्ल्याला ताबडतोब आणि असे उत्तर दयावे की आपल्या देशातील आणि देशाबाहेरील दहशतवादाचे समूळ उच्चाटन व्हावे आणि पुन्हा कोणत्याही दहशतवाद्याने किंवा दहशतवादाला आश्रय देणाऱ्या देशाने आपल्या भारत देशाकडे वाईट नजर टाकण्याचे धारिष्ट करू नये.
आम्हाला आशा आहे की भारत सरकार आणि भारतीय सेना हया दहशतवादी हल्ल्याला ताबडतोब उत्तर देवून दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी योग्य ती कारवाई करेल. अशी मागणी केलेली आहे.
