सातारा : राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयश्री केशव चव्हाण (वय 47, रा. सदरबझार, सातारा) या दि. 16 मे रोजी राहत्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
