सातारा : पेन्शनचा फरक (Pension difference) मिळवून देतो, असे सांगून फसवणूक (Cheating) करणार्या ठगाविरुध्द तक्रारीचा पाढा वाढला असून शाहूपुरी पोलिस ठाण्यातही शोएब अशपाक शेख (रा.करंजे ता.सातारा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अशोक दत्तू दळवी (वय 63, रा. करंजे) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयित अशपाक याने दळवी यांच्याकडून 48500 रुपये घेतले आहेत. मात्र पेन्शनची फरक व घेतलेले पैसे न देता फसवणूक केली. त्याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गेल्या आठवड्यात असाच गुन्हा दाखल झाला आहे.
