सातारा : मुलाला दगडाने मारहाण केल्याप्रकरणी संबंधित पित्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दगडाने मुलाला मारहाण केल्याप्रकरणी वडील योगेश माने (रा. कोडोली) याच्या विरुध्द मुलगा साहिल योगेश माने (वय 19, रा. कोडोली) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 17 मे रोजी घडली आहे.
