सातारा : सातारा शहर पोलिसांनी तडीपार गुंडाकडून २ किलो १८० ग्रॅम वजनाचा सुमारे ७५ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. तडीपार गुंड गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) ही कारवाई केली.
नितीन पांडूरंग सोडमिसे (वय ३१, रा. चुना गल्ली, रविवार पेठ, सातारा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. २० मे रोजी सातारा शहरामध्ये गांजा विक्री करण्यासाठी सातारा शहरातून तडीपार करण्यात आलेला एकजण येणार असल्याची गोपनीय माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना समजली. त्यानुसार डीबीच्या पथकाला शोध घेण्यास सांगण्यात आले. सदरबझार परिसरामध्ये संशयित एका बंद कंपनीचे गोडावूनचे परिसरात आला. दुपारी तो आल्यानंतर त्याच्या हातामध्ये पांढ-या रंगाची पिशवी होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून तडीपार असताना इथे कसा आला? हातात काय आहे? असे प्रश्न विचारताच तो निरुत्तर झाला. पोलिसांनी त्याच्या हातातील पिशवी घेवून पाहणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याने स्पष्ट झाले. त्याने तो विक्री करण्यासाठी आणला असल्याची कबुली दिली.
डीवाएसपी राजीव नवले, पोनि राजेंद्र मस्के, पोनि निलेश तांबे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे सपोनि अविनाश माने, फाौजदार सुधीर मोरे, पोलिस श्रीनिवास देशमुख, राहूल घाडगे, सुजीत भोसले, निलेश जाधव, पंकज मोहिते, संतोष शेलार, विक्रम माने, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी कारवाईत सहभाग घेतला.
