सातारा : मारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हरिदास विठ्ठल मोरे रा. वडूथ, मोरे वस्ती, ता. जि. सातारा यांना तसेच इतर सहा जणांना मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच अंजना सुभाष मुळीक, अजिंक्य सुभाष मुळीक, भरत सुभाष मुळीक, मनीषा दिलीप काटे, स्नेहल अजिंक्य मुळीक, सागर महेश शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार कुंभार करीत आहेत.
याचप्रमाणे अंजना सुभाष मुळीक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना व त्यांच्या दोन्ही मुलांना हाताने मारहाण केल्याप्रकरणी हरिदास विठ्ठल मोरे, कृष्णात विठ्ठल मोरे, ओमकार हरिदास मोरे, ज्योती हरिदास मोरे, कोमल दत्तात्रय मोरे, पिंकी हेमंत मोरे, मोनिका कृष्णात मोरे सर्व रा. वडूथ, मोरे वस्ती, ता. सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.
