सातारा : सातारा शहरात अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी चैन स्नॅचिंग केल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी बॉम्बे रेस्टॉरंट सर्व्हिस रोड जवळील गॅरेजच्या शेजारील रस्त्यावर सौ. शुभांगी राजेंद्र निकम रा. आदर्श नगर, सातारा यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र मोटरसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेले आहे. याच पद्धतीने श्रीमती सुरेखा महिपतराव राजपुरे व श्रीमती शाहीन असिफ मणेर यांच्याही मंगळसूत्रांची चोरी झाली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.
