Explore

Search

April 13, 2025 10:34 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Wai DJ News : डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने घेतला तरुणाचा बळी

वाई : डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने वाईमधील तरुणाचा बळी घेतला आहे. या तरुणावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हेमंत दिलीप करंजे (वय ३८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
शुक्रवारी १० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वाई शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये चार ते पाच डीजेंमध्ये आवाजाची चुरस लागली होती. त्यामुळे वाई शहर दणाणून गेले होते. मिरवणूक वाईच्या किसन वीर चौकात आली असताना डीजेच्या आवाजाची जणू स्पर्धा निर्माण झाली होती.

याचवेळी हेमंत दिलीप करंजे हा मिरवणूक पाहत थांबला होता. डीजेच्या आवाजाच्या दणक्याने चक्कर येऊन तो जागेवरच कोसळला. त्याला तातडीने वाईहून पुण्याला नेण्यात आले. तेथे त्याच्यावर पंधरा दिवस उपचार सुरू होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy