सातारा : सदरबझारमधून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदरबझारमधील राहत्या घरासमोरुन दि. 15 रोजी अज्ञाताने दुचाकी (एमएच 11 सीव्ही 8009) चोरुन नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात ऋषिकेश राठोड (वय 23, रा. सदरबझार, सातारा) याने दिली आहे. पोलीस नाईक सपकाळ तपास करत आहेत.
