सातारा : हॉटेल मालकांची फसवणूक केल्याप्रकरणी पंकज बाबर याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढेफाटा येथील हॉटेल ई लाईटमध्ये राहण्याचे व जेवणाचे 34 हजार 700 रुपये पेमेंट अकाऊंटद्वारे पाठवल्याचे भासवून, तसे मॅसेज पाठवले. मात्र, आजपर्यंत ते पेमेंट दिले नसल्याने हॉटेलचे मालक कौस्तुभ दिलीप मोरे यांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी पंकज गणपत बाबर (रा. चारोली खुर्द, पिंपरी चिंचवड, मूळ रा. जकातवाडी, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दि. 9 फेब्रुवारी ते दि. 14 फेब्रुवारी या कालावधीत घडला. याप्रकरणी रोहित शिवराम भोसले (रा. मंगळवार पेठ, सातारा) याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहायक फौजदार माने तपास करत आहेत.
