Explore

Search

April 13, 2025 10:27 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Political News : संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी : प्रविण दरेकर

मुंबई : संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, आपल्या घराची काळजी करावी, हा देश मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल, असं म्हणत संजय राऊतांवर प्रवीण दरेकरांनी पलटवार केला आहे.
भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले की, “4 जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला दिसेल. कारण योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत, देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे. हे जाहीर सभांमधून अगदी ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे मोदी-योगी असं चित्र उभं करू नका. संजय राऊत तुम्ही आपल्या पक्षाची आपल्या घराची काळजी करा. हा देश, आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल, हे सर्वश्रुत आहे. संजय राऊत भ्रमिष्ट झालेत म्हणून अशा प्रकारच शोधून शोधून, काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटंकी करण्याचा प्रयत्न करतात.”
“सामनाच्या दाव्याला आम्ही काडीमात्र किंमत देत नाही. गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे, संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस. कारण प्रचारात राज्यभर व्यस्त असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आणखी विजय भक्कम व्हावा, यासाठी काय योगदान दिलं आहे ते नागपूरवासियांना माहीत आहे. संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका आहे. अगोदर बोलायचं विरोधात रसद पुरवली, नंतर बोलायचं प्रचारात उतरले, संजय राऊत टीका करताना सुद्धा काय नेमकं बोलायचंय, हे निश्चित करून घ्या.”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy