सातारा : गौरीशंकर कॉलेज देगाव ता.सातारा येथे चौघांनी मुलीशी का बोलतो, या कारणातून एका युवकाला गंभीर दुखापत केली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वेदांत देशमुख, गणेश शिंदे, शिवतेज साळुंखे, विशाल बर्गे (सर्व रा.कारंडवाडी ता.सातारा) यांच्या विरुध्द यश पंकज पाटील (वय 21, सध्या रा.संभाजीनगर, सातारा) या युवकाने तक्रार दिली आहे. ही घटना दि. 25 मे रोजी घडली आहे. संशयित टोळक्याने वीटने मारहाण केली असून यश पाटील याचा मित्र भांडणे सोडवण्यासाठी गेला असता त्यालाही मारहाण झाली आहे.
