उज्ज्वल निकालाची परंपरा राखली कायम
सातारा : महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या व पश्चिम महाराष्ट्रात शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था साताराच्या शाखांनी इ. 10 वी परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केले.
संस्थेच्या श्री. छ. प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, माने कॉलनी, सातारा. शाखेचा 100 टक्के यशस्वी निकाल लागला असून या शाखेतील आदित्य रूपेश साळवे यांने 89.40 टक्के गण मिळवून प्रथम, कु. सार्थकी सोमनाथ चव्हाण हिने 84.00 टक्के गुण मिळवून द्वितीय, कु. सानिका विनोद सोनटक्के हिने 83.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावून उज्वल यश संपादन केले.
संस्थेच्या दुर्गंम, डोंगरी भागात असलेल्या श्रीराम माध्यमिक विद्यालय चिखली ता. जि. सातारा. या शाखेचा 96.50 टक्के निकाल लागला असून या शाखेतील संदेश एकनाथ सपकाळ याने 91.40 टक्के गुण मिळवून प्रथम, कु. अमिता निवृत्ती वाघमोडे हिने 82.40 टक्के गुण मिळवून द्वितीय, कु. भावना संतोष यादव हिने 81.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकविला.
संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल जायगांव ता. कोरेगांव जि. सातारा. या शाखेचा 100 टक्के निकाल लागला असून शाखेतील कु. पुर्वा किरण कदम हिने 90.40 टक्के गुण मिळवून प्रथम, कु. प्राची किरण कदम हिने 88.00 टक्के गुण मिळवून द्वितीय, कु. श्वेता संतोष संकपाळ हिने 87.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकविला.
संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कुसवडे ता. जि. सातारा. शाखेचा 90 टक्के निकाल लागला असून शाखेतील मयूर प्रताप भोसले याने 78.60 टक्के गुण मिळवून प्रथम, कु. पायल सर्जेराव गोडसे हिने 76.80 टक्के गुण मिळवून द्वितीय, कु. वैष्णवी संदिप खामकर हिने 76.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकविला.
संस्थेच्या सर्व शाखांनी आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत सश संपादन केल्याबदद्ल राजकीय-सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, संस्थेचे सभासद व संचालक, हितचिंतक, शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य व पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी यांनी निकालाची उज्वल परंपरा कायम राखण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
