सातारा : आमदार. जी. जी. कदम प्रतिष्ठान मेढा, संचलित न्यू वेण्णा इंग्लिश मीडियम स्कूल ऍण्ड ज्युनियर कॉलेज मोहाट -अंधारी च्या विद्यार्थ्यांनी बारावी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यावर्षीही महाविद्यालयाने 100 टक्के यशस्वी निकालाची परंपरा अबाधित ठेवली आहे.
आमदार. जी. जी. कदम प्रतिष्ठान मेढा, संचलित न्यू वेण्णा इंग्लिश मीडियम स्कूल ऍण्ड ज्युनियर कॉलेज मोहाट -अंधारी हे महाविद्यालय सन 2017-18 पासून सुरु करण्यात आले. महाविद्यालयामध्ये दूर्गम भागातील निपाणी, आपटी, तेटली, सावरी, म्हावशी, बामणोली, खिरकंडी, फळणी, पावशेवाडी, अंधारी, कास, कोळघर, उंबरीवाडी या विविध गावातून ज्युनिअर कॉलेजला (11 वी, 12 वी) मुले येत असतात.
सर्वोत्तक शिक्षक वृंदामुळे महाविद्यालयास नेहमी यशच मिळत गेले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण असल्यामुळे या महाविद्यालयाची पटसंख्या वाढतीच आहे. यावर्षी 12 वी ची सहावी बॅच सन 2023-24 या साली होती. प्रत्येक वर्षी या महाविद्यालयाची इयत्ता 12 वी च्या 100 टक्के निकालांची परंपरा कायम चालू आहे.
शैक्षणिक वर्ष 2023-24 चा निकाल जबाबदार शालेय प्रशासन, कुशल शिक्षक, विद्यार्थ्यांना मिळणारे अचूक मार्गदर्शन त्यामुळे याही वर्षी आमदार. जी. जी. कदम प्रतिष्ठान मेढा, संचलित न्यू वेण्णा इंग्लिश मीडियम स्कूल ऍण्ड ज्युनियर कॉलेज मोहाट -अंधारी चा निकाल 100 टक्के लागला.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक : रोहिणी आनंद कदम (71.83 टक्के), द्वितीय क्रमांक : प्रतिक एकनाथ शेलार (69.6 टक्के), तृतीय क्रमांक : शुभम तानाजी शेलार (67.17 टक्के) यांनी बाजी मारली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशालता कदम,
सचिव अमितदादा कदम, संचालक, प्राचार्या सौ. शीतल अमित कदम, शिक्षक पडगे, संजय गुरव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालकांचे विशेष सदकार्य मिळत आहे. शिक्षक पडगे व इतर शिक्षक विद्यार्थ्यांसाठी विशेष परिश्रम घेत आहेत. स्थानिकांमधील रविंद्र शेलार, चंद्रकांत शिंदे, कास, अंधारी, फळणी, उंबरी ग्रामस्थ मंडळ व विभागातील पालकांचे सातत्याने सहकार्य संस्थेस मिळत राहीले आहे.
