Explore

Search

April 19, 2025 10:33 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Mumbai News : नव्या मराठी सिनेमाची घोषणा

रघु बोलला…तर विषय संपला!

मुंबई : गेल्या काही दिवसांत अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. काही सिनेमे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. अशातच आता आणखी एका नव्या मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. आजवर अनेक रोमँटिक, अॅक्शन, रहस्यमय सिनेमांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटांच्या यादीत आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. ‘रघु ३५०’ या मराठी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘रघु ३५०’ या नव्या कोऱ्या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. एक आशयघन आणि  रहस्यमय कथानक या सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. हा चित्रपट अॅक्शनची साथ देणार की रोमान्सची याची उत्सुकता चित्रपटाच्या पोस्टरवरून निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर बाईक चालवताना एक तरुण दिसत आहे. “रघु बोलला विषय संपला” असं त्या पोस्टरवर लिहिलं आहे. या चित्रपटात कोणते कलाकार पाहायला मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

‘सुदर्शन फिल्म एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘रघु ३५०’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते संतोष भोसले यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर दिग्दर्शक आशिष मडके यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तसेच संपूर्ण चित्रपट करण तांदळे यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केला आहे. चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक विजय गीते यांनी सांभाळली आहे. तर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून सुधीर भालेराव यांनी बाजू सांभाळली आहे.

रहस्यमय अशा या चित्रपटात नेमकी प्रेमाची, मैत्रीची कोणती  मिसाल उलगडणार हे आगामी  ‘रघु ३५०’ चित्रपटातून कळेल. बाईकवरून रावडी एन्ट्री घेतलेला तो इसम नेमका कोण आहे? हे देखील गुलदस्त्यात असून या पोस्टरवरून हा चित्रपट ऍक्शनपट असल्याचं बोललं जातं. हा सिनेमा २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy