Explore

Search

April 19, 2025 10:31 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Shirwal News : विवाहितेला गळफास लावत जीवे मारण्याचा प्रयत्न

पती-पत्नीस अटक

शिरवळ : वडवाडी ता. खंडाळा येथे पतीला मोबाईलवर केलेले संदेश व्हायरल करण्याची धमकी देत २ लाख रुपये न दिल्याने विवाहितेला गळफास लावत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली.

याप्रकरणी विशाल दिलीप बामणे (वय ३३), रेश्मा विशाल बामणे (३०, रा.वडवाडी ता.खंडाळा) असे अटक केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडवाडी येथील मयुरी किरण जाधव (वय २१) ही विवाहिता कुटुंबियांसमवेत राहते. साधारण दोन महिन्यांपूर्वी मयुरी ही कपडे वाळत घालत असताना विशाल बामणे याने चिठ्ठीद्वारे मोबाईल नंबर देत संदेश पाठविण्यास सांगितले. मयुरी अन् विशाल फोन तसेच मॅसेजवर बोलत असल्याचे विशालची पत्नी रेश्मा हिला समजल्यानंतर मयुरीकडे २ लाख रुपयांची मागणी करत संदेश व्हायरल करण्याची धमकी दिली.

दरम्यान, ३० एप्रिल रोजी मयुरीला गळफास लावत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ती बेशुद्ध पडल्याच्या अवस्थेत सासरे रमेश जाधव यांनी त्वरित भोर जि. पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी मयुरी जाधव हिने दिलेल्या फिर्यादीवरून शिरवळ पोलीस ठाण्यात विशाल बामणे व रेश्मा बामणे ह्या पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून पोलीस उपनिरीक्षक नयना कामथे ह्या अधिक तपास  आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy