मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंत्रालयासमोरील इमारतीवरुन उडी मारून तिने आत्महत्या केली आहे. अधिकाऱ्याची मुलगी LLB चं शिक्षण घेत होती. मुंबईतील सुनीती नावाच्या इमारतीवरुन तिने उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे.
मुंबईत आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील सुनीती नावाच्या इमारतीवरुन उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लिपी रस्तोगी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. लिपी ही कायद्याचे शिक्षण घेत होती. लिपी रस्तोगीच्या आत्महत्येचं पाऊल उचलण्यामागचं कारणही समोर आलं आहे.
साम टिव्हीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, महाराष्ट्र कॅडरचे आएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या घरात आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी देखील सापडली आहे. रस्तोगी यांच्या मुलीचं वय २७ वर्ष आहे. विकास रस्तोगी सध्या शिक्षण विभागाचे सचिव आहेत.
लिपी रस्तोगीने आज (सोमवारी) पहाटे चार वाजता १० मजली इमारतीवरून उडी घेतली. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला आहे. उडी घेतल्यानंतर तिला तातडीने जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, जीटी रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं. लिपीच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
लिपी रस्तोगी हरियाणाच्या सोनिपत येथे एलएलबीचं शिक्षण घेत होती. शैक्षणिक कामगिरीवर चिंतित असल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.
