Explore

Search

April 19, 2025 10:31 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ८ जून रोजी शपथविधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे काल निकाल समोर आले. एनडीएने मोठी आघाडी घेत बहुमत मिळवले. दरम्यान, आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. एनडीए तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे. त्यासाठी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. ८ जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच नरेंद्र मोदींच्या नावावर एक नवा विक्रम होणार आहे. सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील. यापूर्वी हा विक्रम जवाहरलाल नेहरूंच्या नावावर होता. आज दुपारी ४ वाजता दिल्लीत एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. यात जेडीयू प्रमुख नितीश कुमार, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि इतर नेते सहभागी होणार आहेत. एनडीएच्या मित्रपक्षांशी चर्चेनंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये सरकार स्थापनेची रुपरेषा आणि शपथविधी यावर चर्चा होणार आहे.

जेडीयू प्रमुख नितीश कुमार बुधवारी सकाळी दिल्लीत पोहोचले. चंद्राबाबू नायडूही दुपारपर्यंत दिल्लीला पोहोचू शकतात. २०१९ च्या निकालानंतर ७ दिवसांनी पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा पार पडला होता. २०१४ मध्ये जेव्हा NDA सरकार स्थापन झाले तेव्हा १० दिवसांनी मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.

लोकसभेचा निकाल :

लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले आहे. एनडीएने २९२ जागा जिंकल्या. तर इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या आहेत. तर अपक्ष ७ उमेदवार जिंकले आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy