सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके तर्फे नविन ‘‘टाटा हैवा डंपर’’ वाहनासाठी कर्ज वितरण
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ग्राहक व शिंदे एंटरप्रायजेस अनवडी, ता .वाई चे मालक पांडुरंग भिकू शिंदे यांना बँकेच्या ओझर्डे, ता .वाई शाखेमार्फत नविन वाहन कर्ज योजनेअंतर्गत नविन ‘‘टाटा हैवा डंपर’’ खरेदीसाठी कर्ज वितरण केले असून, वाहन वितरणाचा कार्यक्रम बँकेचे अध्यक्ष मा. श्री .नितीनकाका पाटील यांचे शुभहस्ते तसेच बँकेचे संचालक मा. प्रदिप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक मा. राजेंद्र भिलारे आदी मान्यवरांचे उपस्थितीत करणेत आला. शिंदे यांना सदर कर्जास आणासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व्याज परतावा योजनेचा लाभ मिळणार असलेने कर्जाचा व्याजदर ‘शून्य’ टक्के पडणार आहे .
या प्रसंगी मा. नितीनकाका पाटील यांनी बँक जिल्हयातील शेतकरी व नवउद्योजकांना केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेचे सांगितले. बँक जिल्हयातील शेतकरी, कष्टकरी, व्यवसायीक व उद्योजकांच्या आर्थिक उन्नतीसाठी कटीबध्द आहे. जिल्हयात नवनविन व्यवसायीक तयार व्हावेत, रोजगार निर्मिती व्हावी व त्यातूनच सर्व सामान्यांची उन्नती होणेस्तव बँक आभ्यासपूर्ण व सातत्याने प्रयत्नशिल आहे. बदलत्या काळानुसार बँकेने विविध कर्ज धोरणात सुधारणा करून नवनविन कर्ज धोरणांची आखणी केली आहे. माफक व्याजदरात शासनाच्या अनुदान प्राप्त व व्याज परतावा प्राप्त योजना बँकेने कार्यान्वीत केलेल्या आहेत. त्याचा लाभ जिल्हयातील सर्व समाजघटकांनी घ्यावा असे अहवान केले. त्याचबरोबर सदरचे ‘‘टाटा हैवा डंपर’’ ची त्यांनी स्वतः टेस्ट ड्राईव्ह सुध्दा घेतली व शिंदे यांना शुभेच्छा दिल्या .
डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँक अनेकविध व्यवसायांसाठी कर्जपुरवठा करत असून यामध्ये मराठा समाजातील उद्योजकांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेतून शून्य टक्केने कर्ज पुरवठा तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कृत इतर जाती जमाती मधील सर्व घटकांसाठी व्याज परतावा योजनेतून व्यवसाय उभारणीसाठी कर्जे, मा .मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मा .प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत २५ ते ३५ टक्के अनुदानीत कर्ज पुरवठा तसेच नविन दुचाकी व चारचाकी वाहन कर्ज योजना व्यवसायासाठी कॅश क्रेडीट कर्ज, गृहबांधणीसाठी गृहसंकल्पपूर्ती कर्ज योजना, कंपाझिट लोन नं ३ कर्ज योजना, किसान सन्मान कर्ज योजने अंतर्गत तात्काळ कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सोनेतारण कर्ज योजना, नोकरदार कर्मचा-यांसाठी सॅलरी पॅकेज कर्ज योजना इत्यादी अनेकविध कर्ज योजनांचे माध्यमातून किफायतशीर व्याजदराने कर्ज पूरवठा करत असून सदर योजनांचे माध्यमातून कर्ज व व्याज अनुदानाचा लाभ घेणेसाठी जवळच्या शाखेत संपर्क साधण्याचे अवाहन केले.
राजेंद्र भिलारे यांनी बँक सातारा जिल्हयातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी कार्यरत असून किफायतशीर व्याजदर व सुलभ कर्ज पुरवठयाचा लाभ घेवून स्वतःबरोबरच जिल्हयाच्या विकासासाठी हातभार लावण्याचे अवाहन केले . बँकेने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘‘अमृत आधार कर्ज योजना’’ कार्यान्वीत केली असून सदर योजना राज्य शासनाच्या मा .मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व मा .प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून अनुदान प्राप्त होत असलेने त्याचा लाभ घ्यावा असे सुचित केले.
याप्रसंगी बिगरशेती विभागाचे व्यवस्थापक यशवंत साळुंखे यांनी सर्वांचे आभार मानले व शिंदे एंटरप्रायजेसचे मालक पांडुरंग शिंदे यांना पुढील काळात बँक आपणास व्यवसाय वृध्दीसाठी कायम सहकार्य करेल असे आश्वासित केले. वाहन मालक पांडुरंग शिंदे यांनी महाराष्ट्र शासन पुरस्कृत आण्णासाहेब पाटील व्याज परतावा योजनेतून बिनव्याजी तसेच कमीत-कमी कागदपत्रात अत्यल्प वेळेत बँकेने कर्ज पुरवठा केलेबददल बँकेचे आभार मानले.
