Explore

Search

April 12, 2025 10:45 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : कासच्या स्वच्छतेसाठी एकवटले सातारकरांचे शेकडो हात

सातारा : एकच ध्यास स्वच्छ कास असा जयघोष करत आज सातारा नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा सातारकर नागरिकांनी कास तलावाजवळ प्लास्टिक कचऱ्याविरुद्ध एल्गार पुकारला. चार तासात सुमारे दोन टन प्लास्टिक कचरा तलावाच्या पाण्यात जाण्यापासून रोखण्यात आज यश आले.
कास तलाव हा सातारकरांचा मानबिंदू आहे. मात्र, तेथे प्लास्टिक कचरा टाकून या मानबिंदूला धक्का लावण्याचा प्रयत्न काही बेशिस्त नागरिक करतात पावसाळ्यामध्ये तलावातील पाणी वाढून हाच प्लास्टिकचा कचरा सातारा शहराची तहान भागवणाऱ्या कास तलावात जातो. यावर्षी पावसाळ्यात तलावात अधिक पाणीसाठा होणार आहे. प्लास्टिक कच-यामुळे दूषित झालेले पाणी पिण्याचा धोका सातारकरांवर ओढवू शकतो.
हा धोका टाळण्यासाठी सातारा नगरपरिषद व हरित सातारा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने का स्थला परिसरात आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली सकाळी आठ वाजता या मोहिमेला सुरुवात झाली हातमोजे नाकावर मास्क व हातात पोती घेऊन हे स्वच्छता दूत कास तलावाचा काठ तसेच लगतच्या झाडीमध्ये शिरले. तलाव परिसरात खाद्यपदार्थांची वेस्टने, मद्याच्या व पाण्याच्या बाटल्या, मद्याचे कॅन, लहान मुलांचे डायपर, चपला-बूट, प्लास्टिकचे कागद, पत्रावळ्या, सिगरेटच्या पाकिटाची वेस्टने आदी स्वरूपातील प्लास्टिक व इतर कचरा मोठ्या प्रमाणात साचला होता. स्वच्छता दूतांनी हा कोतकचरा पोत्यामध्ये गोळा करून नगरपालिकेच्या वाहनातून सोनगाव कचरा डेपो मध्ये नेऊन त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात आली. कास तलाव परिसर तसेच भिंतीलगतचा भाग या ठिकाणी सुमारे दोन टन प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला या मोहिमेमध्ये सतत नगर परिषदेचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड, निरीक्षक प्रवीण यादव, गणेश टोपे, आरोग्य अभियंता नितीन माळवे, हरित साताराचे संजय मिरजकर, भालचंद्र गोताड, उमेश खंडूजोडे, निखिल घोरपडे, संजय झेपले, साईराज पवार, जय गायकवाड, चंद्रसेन फडतरे, इपसा फडतरे, अमृता भोसले आदी उपस्थित होते.

“कास तलाव परिसरात दरवर्षी सातारकर नागरिक तसेच सातारा नगरपरिषद मोहीम राबवून प्लास्टिक कचरा गोळा करते. या या ठिकाणी प्लास्टिक कचरा पडणार नाही यासाठी नगरपालिकेने कायमस्वरूपी उपाय योजावेत.”
– संजय मिरजकर,
सातारकर नागरिक.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy