सातारा : महाराणा प्रताप उत्सव समिती व राजपूत समाजाकड़ून आज रविवार दि. 9 रोजी महाराणा प्रताप यांची 464वी जयंती राधिका रोड वरील महाराणा प्रताप चौकामध्ये साजरी करण्यात आली. याठिकाणी भव्य असा सेट उभा करून सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते मूर्ति पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी रक्तदान शिबीर, डोळ्याची निःशुल्क तपासणी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे व वाहतूक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांच्या हस्ते मूर्ति पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना जगदाळे म्हणाले, आपण या महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. महाराणा प्रताप यांच्यासारखे युगपुरुष परत होणे नाही. आजच्या तरुणांनी या युगपुरूषांप्रमाणे ध्येयसिध्द असावे. बलदंड व उदिष्ट पूर्ण करणारी पिढी रचनात्मक समाज निर्माण करू शकते.
वाहतूक पोलीस निरीक्षक यादव यांनी आपण रक्तदान शिबिर घेतल्याने त्याचा एका जरी व्यक्तिचे प्राण आपल्यामुळे वाचले तर आपले आयुष्याचे सार्थक झल्यासारखे वाटते. असे उपक्रम महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त आपण दर वर्षी घेता त्याबदल त्यानी राजपूत समाजाचे कौतुक केले.
यानंतर गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे प्रशस्तिपत्र व ट्रॉफी देउन सत्कार करण्यात आले. आभार प्रदर्शन संजयसिंह राजपूत यानीं केले. वीरसिंह परदेशी, अवधूत परदेशी, राजेंद्रसिंह राजपूत, ओंकार परदेशी, महेश राजपूत, अभय परदेशी, नितिन परदेशी, माणिक राजपूत, विनायक राजपूत, मुकुंद परदेशी, शैलेंद्र राजपूत आदी यावेळी उपस्थित होते.
