नाणेफेकीच्या वेळेस झाला गोंधळ अन् बाबर आझमने…
न्यूयॉर्क : टी-२० विश्वचषकातील भारत पाकिस्तान सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आहे. सध्याच्या घडीला १ षटकं खेळून झाल्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने सामना थांबवण्यात आला. तर सामना सुरू होण्याआधीही पावसाच्या सरी आल्या होत्या. नाणेफेकीदरम्यान विसरभोळ्या रोहितचा पुन्हा एकदा किस्सा घडला.
नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेतील बहुप्रतिक्षित सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हलक्या पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाला. पुरुषांच्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा विक्रम ६-१ असा आहे. उभय संघांमधील मागील पाच टी-२० विश्वचषक सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.
