सलमान खानच्या व्हिडीओची चर्चा
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या कूल आणि हटके स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. सलमानचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. तसेच सलमान हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. नुकताच सलमानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा सायकल राईड करताना दिसत आहे.
2017 मध्ये सलमान खाननं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये मुंबईतील वांद्रे येथे सलमान सायकल राईड करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, सलमान सायकल चावताना त्याची टीम त्याला कार आणि बाईकवरुन फॉलो करत आहे.
व्हिडीओमध्ये दिसते की सलमान सायकल चालवत असताना तो शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याच्या जवळून जातो. मन्नत या बंगल्याच्या जवळून जात असताना सलमान हा शाहरुख खानचं नाव घेऊन ओरडतो.
सलमानने त्याच्या बीइंग ह्युमन या ब्रँडच्या सायकलचे कलेक्शन लॉन्च केले होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सलमान हा बीइंग ह्युमन या ब्रँडची सायकल चालवताना दिसत आहे.
सलमान आणि शाहरुख यांनी करण अर्जुन, हम तुम्हारे है सनम, कुछ कुछ होता है आणि पठाण या चित्रपटात स्क्रिन शेअर केली होती. आता त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक वाट बघत आहेत.
