इश्क विश्क रिबाउंड’ मधील गाण्याची सर्वत्र चर्चा
‘इश्क विश्क रिबाउंड’ मधल नवीन गाण ‘गोर गोर मुखडे पे’ रिलीज झाल असून हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही. या गाण्यातील स्टायलिश रोहित सराफच्या जबरदस्त डान्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. जिब्रान खान, पश्मिना रोशन आणि नाइला ग्रेवाल यांच्यासोबत उदित नारायण, बादशाह आणि निकिता गांधी यांच्या आवाजातील आणि स्वत: बादशाहनं लिहिलेल्या या नव्या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
याआधी ‘इश्क विश्क रिबाउंड’ या चित्रपटातील ‘सोनी सोनी’, ‘इश्क विश्क प्यार व्यार’ आणि ‘छोट दिल पे लागी’ या चित्रपटातील गाण्यांना चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. ही गाणी सोशल मीडियावर ट्रेंड झाली. आता ‘गोरे गोरे मुखडे पे’ हे गाणं देखील सोशल मीडियावर ट्रेंड होणार का? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
30 वर्षापूर्वी अक्षय कुमार आणि नगमा या दोघांचे ‘गोर गोर मुखडे पे’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. अशातच आता 30 वर्षानंतर ‘गोर गोर मुखडे पे’ या गाण्याचा ‘इश्क विश्क रिबाउंड’ या चित्रपटात रिमेक पाहिल्यानंतर प्रेक्षक आश्चर्यचकीत झाले आहेत.
‘इश्क विश्क रिबाउंड’ व्यतिरिक्त रोहित सराफ ‘मिसमॅच 3’ मध्ये ऋषी शेखावतची व्यक्तिरेखा पुन्हा साकारणार आहे. तो सध्या धर्मा प्रॉडक्शनच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ साठी शूटिंग करत आहे, ज्यामध्ये तो वरुण धवन, जान्हवी कपूर आणि सान्या मल्होत्रासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसेल.
