Explore

Search

April 13, 2025 10:25 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : आपत्कालीन कक्ष सातारा जिल्ह्यात २४ तास सुरू

सातारा : पावसाळा सुरू झाला असून, जिल्हा प्रशासनही सज्ज आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एक जूनपासूनच २४ तास आपत्कालीन कक्ष सुरू आहे. यामुळे दरड कोसळली, पूर आला तर लगेच अशी संकटे दूर करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तर पावसाळ्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी कराड आणि पाटण तालुक्यात नदीमध्ये बोटिंग चाचणी घेण्यात आली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २४ तास सतर्क असून विविध पातळीवर तयारी आणि उपाययोजना केल्या आहेत.

जिल्ह्यात जूनपासून पावसाला सुरुवात होते. दरवर्षी साधारणपणे ७ ते १० जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर पाऊस पडण्यास सुरुवात होते. सुरुवातीचे दोन ते अडीच महिने जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार पाऊस कोसळतो. महाबळेश्वर, कोयना, कास, बामणोली, तापोळा, कांदाटी खोऱ्यात पर्जन्यमान अधिक राहते. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत होते. अनेक दिवस लोकांना घराबाहेर पडता येत नाही.

तसेच रस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका असतो, झाडे पडतात. अशा काळात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो. त्याचबरोबर अतिवृष्टीच्या काळात कोयना, कृष्णा नदीला महापूर येतो. काहीवेळा पाणी पात्राबाहेर जाते. यासाठीही जिल्हा प्रशासनाला दक्ष राहावे लागते. याकरिता जिल्हा प्रशासन एक महिना अगोदरच आढावा घेऊन तयारी करते. आताही पावसाळ्याला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दरवर्षी एक जूनपासून आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात येतो. हा कक्ष २४ तास सुरू असतो. आताही हा कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. तसेच विविध विभागांचेही कक्ष सुरू राहणार आहेत. तर कऱ्हाड आणि पाटण तालुक्यात पूरस्थिती निर्माण होते. नदीकाठच्या रहिवाशांना धोका निर्माण होतो. या काळात उपाययोजना राबविण्यात येतात.

या पार्श्वभूमीवर आपत्कालीन विभागाच्या वतीने कऱ्हाड येथील प्रीतिसंगम परिसरात बोटिंग चाचणी घेण्यात आली. यावेळी बोटी, लाइफ जॅकेट, दोरखंड, स्ट्रेचर आदींचा वापर करण्यात आला. यावेळी कऱ्हाड पालिकेचे पथक तसेच १५० होमगार्ड्स, नदी काठावरील गावांतील तरुण, तलाठी, मंडलाधिकारी सहभागी झाले होते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy