Explore

Search

April 14, 2025 1:39 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Indian Army Robo Dogs : भारतीय सैन्याचे रोबो डॉग्स शत्रुवर पडणार तुटून

नवी दिल्ली  : भारतीय सैन्यात लवकरच कुत्र्यांच्या आकाराचे रोबोटिक MULES, म्हणजेच मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट सामील केले जाणार आहेत. हे रोबोट कुत्रे गरज पडल्यास शत्रुंवर गोळीदेखील चालवू शकतात. यांचा वापर प्रामुख्याने पाळत ठेवणे आणि कमी वजनाचे सामान वाहून नेण्यासाठी केला जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लष्कराने 100 रोबो कुत्र्यांची ऑर्डर दिली होती. आता पहिल्या बॅचमधील 25 MULES ची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच हे रोबो कुत्रे सैन्यात सामील होणार आहेत.

रोबो कुत्रे काय-काय करतील?
या रोबो कुत्र्यांमध्ये थर्मल कॅमरे आणि इतर विविध प्रकारचे सेंसर लावले आहेत, जे सीमेवर चोख ताळत ठेवू शकतात. या कुत्र्यांना रिमोटद्वारे कंट्रोल केले जाऊ शकते. रस्ते, जंगल, डोंगर… अशा विविध ठिकाणी हे कुत्रे चालू शकतात. विशेष म्हणजे, या रोबो कुत्र्यांमध्ये लहान आकाराची शस्त्रे बसवली जातील, जी गरज पडल्यास शत्रुवर हल्ला करण्यास सक्षम आहे.

कामगिरी चांगली असल्यास संख्या वाढवणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या प्राथमिक स्वरुपात रोबो कुत्र्यांची खरेदी केली जाईल. ही ऑर्डर 300 कोटी रुपयांची असेल. जर या रोबो कुत्र्यांनी चांगली कामगिरी केली, तर त्यांची संख्या वाढवली जाईल.

रोबो कुत्र्यांची वैशिष्ट्ये

1)  चार पायांच्या रोबोटिक MULES चे वजन 51 किलोग्राम असून, त्याची लांबी 27 इंच आहे.

2) या कुत्र्यांमध्ये थर्मल कॅमेरे आणि इतर विविध सेंसर लावले आहेत. याच्या मदतीने शत्रुचे लोकेशन सहजरित्या मिळवता येते. हे रात्रीच्या अंधारातदेखील काम करू शकतात.

3) या रोबो कुत्र्यांमध्ये लहान आकाराची शस्त्रे बसवली जातील, जी गरज पडल्यास शत्रुवर हल्ला करण्यास सक्षम आहे.

4)रस्ते, जंगल, डोंगर, अशा विविध ठिकाणी हे कुत्रे चालू शकतात आणि आपल्यासोबत काही सामानदेखील वाहून नेऊ शकतात.

5) या रोबो कुत्र्यांमध्ये पॉवरफुल बॅटरी आहे, जी एका चार्जमध्ये 10 तास काम करू शकते.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy