Explore

Search

April 19, 2025 8:07 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : लग्न होताच सोनाक्षी आनंदाच्या भरात मारू लागली उड्या

शत्रुघ्न सिन्हा मात्र खामोश, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सोनाक्षी आणि जहीरने रजिस्टर पद्धतीने कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत रविवारी(२३ जून) विवाह केला. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातीलच एका व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

लग्नासाठी सोनाक्षीने तिच्या आईची ४४ वर्ष जुनी साडी नेसत अगदी साधा लूक केला होता. तर जहीरनेदेखील कुर्ता परिधान केला होता. लग्न लागताच सोनाक्षीचा आनंद गगनात मावेनासा झाला. रजिस्टरवर सही करताना सोनाक्षीच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. याचा एक व्हिडिओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत जहीरशी रजिस्टर मॅरेज केल्यानंतर सोनाक्षी आनंदाच्या भरात उड्या मारत असल्याचं दिसत आहे. पण, सोनाक्षीच्या बाजूला उभ्या असलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या चेहऱ्यावर मात्र काहीच हावभाव दिसत नाहीयेत.

सोनाक्षीच्या लग्नातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असून प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. काहींनी सोनाक्षीला ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी तिच्या चेहऱ्यावर आनंद बघून “नवरीच्या चेहऱ्यावरील आनंद महत्त्वाचा”, असं म्हटलं आहे. सोनाक्षीच्या लग्नामुळे कुटुंबीय नाराज असल्याच्या चर्चांना या व्हिडिओमुळे पुन्हा उधाण आलं आहे.

सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांनी लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. सोनाक्षीप्रमाणेच जहीरदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयाबरोबरच तो मॉडेलिंगदेखील करतो. सोनाक्षी आणि जहीरने डबल XL सिनेमात एकत्र काम केलं होतं. जहीरचे वडील व्यावसायिक असून त्याचे सलमान खानशीही मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy