Explore

Search

April 19, 2025 8:07 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : नाना पाटेकरांनी ऋषी कपूर यांचा सांगितला एक किस्सा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी इंडस्ट्री आणि त्यांच्या पर्सनल आयुष्याविषयी अनेक गौप्यस्फोट केले. यामध्येच त्यांनी दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा एक किस्सा सांगितला आहे. एका सिनेमाच्या सेटवर ऋषी कपूर यांनी अर्वाच्च भाषेत नाना पाटेकरांना शिवीगाळ केली होती.

नाना पाटेकर (nana patekar) आणि ऋषी कपूर (rishi kapoor) यांचा १९९५ साली प्रदर्शित झालेला हम दोनो हा सिनेमा जवळपास अनेकांच्या लक्षात असेल. या सिनेमाच्या सेटवर ऋषी कपूरमुळे नाना पाटेकरांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला.

ऋषी कपूरने केली नाना पाटेकरांना शिवीगाळ

“तो सेटवर खूप शिवीगाळ करायची. त्याली राग पण खूप यायचा. कोणताही सीन शूट करतांना तो जास्तीत जास्त एक टेक द्यायचे त्याच्यापेक्षा दुसरा नाही. आणि, लगेच म्हणायचा, मी तुमच्यासारखा नाटक करणारा नाहीये. जर कधी एखादा टेक पुन्हा द्यावा लागला तर लगेच म्हणायचा, काय फालतूपणा करताय”, असं नाना पाटेकरांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, “एकदा सिनेमातील एक सीन मला आवडला नव्हता त्यामुळे मी पुन्हा त्याचा दुसरा टेक घ्यायला सांगितला. तर, लगेच तो मला म्हणाला, डायरेक्टर कोण आहे? तू की शफी? त्यानंतर थेट म्हणाला, याला काढून टाका रे. त्यानंतर कसाबसा करुन त्याने दुसरा टेक दिला. त्याच हे वागणं पाहून, ‘हा काय मुर्खपणा आहे चिंटू’, असं मी विचारलं. त्यावर, त्याने अर्वाच्च शब्दांत मला शिवीगाळ केली. पाचव्या टेकपर्यंत तर तो मला पार मारण्यापर्यंत निघाला होता. मात्र, तो टेक चांगला झाला.”

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy