मुंबई : पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आज अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पात अजित पवार काय मोठ्या घोषणा करणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे काही महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या घोषणांची शक्यता आहे.
उद्देश : आर्थिक, सामाजिक स्थैर्य आणि जीवनमान सुघारण्यासाठी
लाभार्थी – २१ ते ६० वयोगटातील महिला
वार्षिक २,५०,००० प्रेक्षा कमी उत्पन्न असलेले पात्र ठरणार
सुमारे – ३ कोटी हून अधीक महिलांना लाभ अपेक्षित
प्रत्येक लाभार्थ्यांना दरमहा – १५०० रुपये मिळणार.
मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना :
१२ वी पास युवक पात्र
७००० रुपये – वार्षिक
आयटीआय डिप्लोमा – ८००० रुपये
पदवीधर – ९००० रुपये
१८ ते २९ वर्षे वयोगट दरम्यान
अंदाजे लाभार्थी ठरतील
अन्नपूर्णा योजना :
दरवर्षी तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत सर्व महिलांना पात्र
मुख्यंमंत्री बळीराजा वीज सवलत योजना :
कृषी पंपांना विनामुल्य वीज
७.५ एचपी मोटर्स आहे त्या सर्व छोट्या मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज देणार.
40 लाख हून अधीक शेतकऱ्यांना फायदा होईल.
८ लाखाहून शेतकऱ्यांना सौर पंप देण्याचा विचार.
एकूण 50 लाखाहून अधीक शेतकरी लाभार्थी ठरतील.
