Explore

Search

April 16, 2025 11:38 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

सातारा जिल्ह्यातील ७० पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू

पावसाळ्या नंतरही होणार तपासणी

सातारा : मॉन्सूनपूर्वी व मॉन्सून झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्ह्यातील राज्य मार्ग व जिल्हा मार्गावरील विविध पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (सुरक्षा तपासणी) केले जाते. तपासणीत मोठ्या तीन पुलांची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम करण्यात आले आहे.

यामध्ये कोयना जुना पूल (कराड) रेठरे येथील पूल तसेच ढेबेवाडीजवळील नाडे पूल या तिन्ही पुलांची दुरुस्ती करण्यात आली आहे. आता उर्वरित मध्यम व लहान पुलांच्या तपासणीचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यांची तातडीने दुरुस्ती हाती घेतली जाणार आहे.

जिल्ह्यात रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण झालेले आहे. महामार्ग जिल्ह्यातून जात असल्याने या महामार्गाला जोडणाऱ्या इतर सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आता या रस्त्यांवरील पुलांची क्षमता तपासणी व दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाकडून प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर केले जाते.

यामध्ये पुलांमध्ये काही किरकोळ किंवा मोठी दुरुस्ती असेल, तर ती तातडीने केली जाते. पावसाळ्यापूर्वी केलेल्या तपासणीत तीन मोठ्या पुलांमध्ये दुरुस्ती करण्याचा अहवाल आला होता. त्यानुसार बांधकाम विभागाने दुरुस्ती केलेली आहे. यामध्ये कोयना जुना पूल (कऱ्हाड), रेठरे पूल हा कमकुवत झाला होता.

त्याचे काम चांगल्या प्रकारे केल्याने त्याची आणखी २० वर्षे क्षमता वाढली आहे, तसेच नाडे- ढेबेवाडी रस्त्यावरील नाडे पूलही धोकादायक बनला होता. त्याचीही तातडीने दुरुस्ती सुरू केली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

कोरेगाव रस्त्यावरील संगममाहुलीजवळील पुलाला शंभरपेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. हा पूल राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झाला आहे. त्याची दुरुस्ती, देखभाल त्यांच्या माध्यमातून होत आहे.

अहवालाची प्रतीक्षा…

जिल्ह्यात मोठे पूल चार, मध्यम ४१ तर लहान २९ पूल आहेत. या पुलांची पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर तपासणी केली जाते. सध्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सुरू आहे. याचा अहवाल आल्यानंतर त्याची तातडीने दुरुस्ती होणार आहे. यापूर्वी तीन मोठ्या पुलांची तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे.

कोयना जुना पूल (कराड) व रेठरे पुलाची २० वर्षे वाढली क्षमता
नाडे- ढेबेवाडी रस्त्यावरील नाडे पुलाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात
कोरेगाव रस्त्यावरील संगममाहुलीजवळील पुलाची देखभाल राष्ट्रीय महामार्गाकडे
Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy