Explore

Search

April 15, 2025 6:10 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

T20 World Cup 2024 : भारत-दक्षिण अफ्रिका अंतिम सामन्यापू्र्वी ऑस्ट्रेलियाची पोटदुखी

नवी दिल्ली : टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे आता अंतिम फेरीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा, तर दक्षिण अफ्रिकेचं नेतृत्व एडन मार्करम याच्याकडे आहे. या अंतिम सामन्यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी20 वर्ल्डकप संघाची घोषणा केली आहे. म्हणजेच आतापर्यंत झालेल्या क्रिकेट सामन्यांचं आकलन करून बेस्ट प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. यात या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश केला आहे. पण या संघाची धुरा भलत्याच खेळाडूकडे दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रोहित शर्मा आणि एडन मार्करमचा खऱ्या अर्थाने मान असताना अफगाणिस्तानच्या राशिद खानची कर्णधारपदी निवड केली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते आणि विशेष करून रोहितच्या चाहत्यांनी राग व्यक्त केला आहे. कारण रोहित शर्माने स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध 92 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं पराभवाचं तोंड पाहावं लागलं आणि स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या प्लेइंग 11 मध्ये फक्त तीन भारतीयांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी दोन खेळाडू आहे. तर अमेरिकेच्या आरोन जोन्सला संघाता स्थान दिलं आहे. दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज आणि बांग्लादेशच्या एका खेळाडूला संघात घेतलं आहे. रोहित शर्मा आणि ट्रेव्हिस हेड हे सलामीवीर असतील. तर वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड केली आहे. मार्कस स्टॉयनिस आणि हार्दिक पांड्या हे अष्टपैलू खेळाडू असतील.

अफगाणिस्तानच्या राशिद खानकडे कर्णधार पद सोपवलं आहे. तसेच राशीद खान आणि बांगलादेशच्या रिशद हुसैनच्या खांद्यावर फिरकीची मदार असेल. तर जसप्रीत बुमराह, एनरिक नोर्त्जे आणि फजलहक फारुकीकडे वेगवान गोलंदाजीची धुरा असेल.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेला वर्ल्डकप संघ : ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), निकोलस पूरन (वेस्ट इंडिज),आरोन जोन्स (यूएसए), मार्कस स्टॉयनिस (ऑस्ट्रेलिया), हार्दिक पांड्या (भारत), राशिद खान (कर्णधार) (अफगाणिस्तान), रिशाद हुसेन (बांगलादेश), हेन्रिक नोर्त्जे (दक्षिण आफ्रिका),जसप्रीत बुमराह (भारत), फजलहक फारुकी (अफगाणिस्तान).

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy