चॅम्पियन टीम इंडियाला मिळाले २०.४ कोटी बक्षीस स्वरुपात
बार्बाडोस : टीम इंडिया (Team India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील खेळलेले सर्व सामने जिंकून अंतिम फेरीत पोहचले होते. मात्र टीम इंडियाने अंतिम फेरीत बाजी मारत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध 7 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेला 8 विकेट्स गमावून 169 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाची रोहित शर्माच्या नेतृत्वात पहिली आणि अंतिम फेरीत खेळण्याची ही तिसरी वेळ होती. तर दक्षिण आफ्रिकेची ही वर्ल्ड कप इतिहासात फायनलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. दोन्ही संघांना जिंकण्याची समसमान संधी होती. मात्र टीम इंडियाने सामन्यात अखेरच्या क्षणी जोरात कमबॅक केलं आणि इतिहास रचला. टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची ही 2007 नंतरची पहिली आणि एकूण दुसरी वेळ ठरली. तर टीम इंडियाने टी वर्ल्ड कप जिंकत 2013 नंतर आयसीसी ट्रॉफीची प्रतिक्षा संपवली. टीम इंडियाने 2013 साली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती.
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत दक्षिण आफ्रिकेवर अंतिम सामन्यात 7 धावांनी मात करत टी 20 वर्ल्ड कप चॅम्पियन ठरली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने अडखळत झालेल्या सुरुवातीनंतर जोरदार कमबॅक करत सामन्यावर घटट् पकड मिळवली होती. मात्रा अखेरच्या काही षटकात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल बॉलिंग करत अफलातून कमबॅक केलं आणि दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 169 धावावंर रोखण्यात यश मिळवलं. टीम इंडियाने यासह टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाने 2007 नंतर टी 20 वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2013 नंतर तब्बल 11 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आयसीसी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
चॅम्पियन टीम इंडियाला मिळाले २०.४ कोटी बक्षीस स्वरुपात
T20 विश्वचषकासाठी आयसीसीने यापूर्वीच बक्षीस रक्कम जाहीर केली होती. चॅम्पियन टीम इंडियाला अंतिम सामन्यानंतर २०.४ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. तर दक्षिण आफ्रिकेने १.२८ मिलियन डॉलर्स म्हणजेच १०.६७ कोटी कमावले. उपांत्य फेरीत पोहोचलेल्या इंग्लंड आणि अफगाणिस्तानशिवाय या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर संघही मालामाल झाले आहेत. या विश्वचषकासाठी आयसीसीने एकूण ९३.७ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम ठेवली होती.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका व्यतिरिक्त, T20 विश्वचषक २०२४ च्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या अफगाणिस्तान आणि इंग्लंडच्या संघांना ७,८७,५०० डॉलर म्हणजे सुमारे ६.५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. या टॉप-4 संघांव्यतिरिक्त, यूएसए, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि बांगलादेश, यांनी सुपर-8 मध्ये स्थान मिळवले आहे, त्यांना ३.१७ कोटी रुपये मिळतील.
T20 विश्वचषक २०२४ मध्ये एकूण २० संघ सहभागी झाले होते. ९व्या ते १२व्या क्रमांकावर असलेल्या संघांना अंदाजे २.०६ कोटी रुपये आणि १३व्या ते २०व्या क्रमांकावर असलेल्या संघांना १.८७ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
