सातारा : चेन स्नॅचिंग प्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा लोकसभा निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर पोवई नाका या बरोबरच मोती चौक येथे विजयी रॅली निघाल्यानंतर गर्दीचा गैरफायदा घेवून अनेकांचा चेन स्नॅचिंग झाले होते. त्याप्रकरणी सराईत टोळी पकडली असतानाच आणखी एकाची तक्रार दाखल झाली आहे.
अमित चंद्रकांत साळुंखे (वय 34, सदाशिव पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीची 1 तोळा 73 मिलीची सोन्याची चेन चोरली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
