मुंबई : सध्या ऑनलाईन फ्रॉड्समुळे सर्वचजण हैराण आहेत. सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांमुळे अनेकांना लाखो, कोटींचा गंडा घातला गेल्याच्या घटना अनेकदा कानावर आल्या आहेत. सायबर फसवणुकीचं एक नवं प्रकरण समोर आलं आहे. पीडित महिला मुंबईतील असून ती नोकरीच्या शोधात होती. आणखी एका महिलेनं तिच्या याच गरजेचा फायदा घेत एआय व्हॉईस स्कॅमचा वापर करून तिला तबब्ल 8 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
7 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या पीडित महिलेच्या शेजारणीला 37 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. त्यासाठी तिनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून महिलेचा आवाज तयार केला. रश्मी कार असं आरोपीचं नाव आहे. ही महिला नवी मुंबई येथील रहिवासी आहे. आरोपी महिला तिच्या पतीच्या संगनमतानं हे काम करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. दरम्यान, आरोपी महिलेचा पती फरार आहे.
चांगल्या नोकरीच्या शोधात होती महिला
पीडित महिला 34 वर्षांची विधवा आहे. ती गेल्या अनेक दिवसांपासून चांगल्या नोकरी शोधत असल्याचं तिनं आरोपीला सांगितलं आहे. ही घटना सुमारे 7 महिन्यांपूर्वी सुरू झाली. जिथे महिलेनं अभिमन्यू मेहरा यांच्याशी चर्चा केली. रश्मी कारनं तुझा नंबर दिला असून मी तुला नोकरी शोधण्यास मदत करेल, असं सांगितलं.
पीडित महिला आणि आरोपी महिला एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यानंतर पीडित आणि मेहरानं चॅटिंग सुरू केलं. यानंतर दोघंही रिलेशनशिपमध्ये आले, तरीही पीडिता महिला मेहराला भेटलेली नव्हती. यावेळी पीडितेनं आरोपीच्या बँक खात्यात सुमारे सात लाख रुपये ट्रान्सफर केले. पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, ती नेहमी मेहराला भेटण्याचा प्रयत्न करत असे, मात्र तो नेहमी बोलणं टाळत असे. मेहरा यांनी पीडित महिलेला ब्लँकेटही भेट दिली होती. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
संशय आल्यानंतर महिलेची पोलिसांत धाव
यानंतर पीडितेला संशय आल्यानं तिनं पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तपासादरम्यान रश्मी कारनं कबूल केलं की, ती एक ॲप वापरत होती. ज्याच्या मदतीनं ती तिचा आवाज बदलून पीडितेशी बोलायची. तिनं सांगितलं की, तिनं व्हॉईस चेंजिंग ॲप इन्स्टॉल केलं आहे. त्याच अॅपच्या मदतीनं ती पीडितेशी संवाद साधायची. यासाठी तिनं एक वेगळा फोन नंबर वापरला, जो या उद्देशासाठी खास तयार करण्यात आला होता. पोलिसांनी सांगितलं की, रश्मीच्या पतीला या प्रकरणाची माहिती होती आणि त्यानं हे प्रकरण थांबवण्याऐवजी बायकोला आणखी प्रोत्साहन दिलं.
