Explore

Search

April 12, 2025 8:51 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Rain News : जिल्ह्यात पश्चिम भागात पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

सातारा : महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर कमी असून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मात्र पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळाले. गेल्या २४ तासांत नवजा येथे १०० तर मान्सून सुरु झाल्यापासून आतापर्यंत एकूण ९२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. परिणामी कोयना धरणातील पाणीसाठ्याने १८ टीएमसीचे परिमाण गाठले आहे. दरम्यान सातारा शहरात पावासाने उघडीप घेतल्याचे देखील पाहायला मिळते.

महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात देखील मान्सूनच्या पावसाने वेळेत एन्ट्री केली. मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पण नंतर काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला आणि काही दिवसांसाठी तर पावसाने दडीही दिली. यामध्येच समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नाही. पण शनिवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तर कोयना नगर आणि महाबळेश्वरला १०० मिलीमीटर पेक्षा कमी पावसाची नोंद झाली.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असला तरीही पावसाचा जोर कमीच आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होत असली तरी ती संथगतीने होत आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात ९ हजार ८८८ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा १८.२६ टीएमसी झाला होता, टक्केवारीत हे प्रमाण १७.३५ इतके आहे. तर धरणातील उपयुक्त पाणीसाठा १३.१४ टीएमसी इतका आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजासह कांदाटी खोऱ्यात पाऊस होत असल्याने ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. जुलै महिन्यात पावसाने जोर धरल्यानंतरच धरणसाठ्यात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सातारा शहराला अद्याप मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. मागील आठ दिवसांपासून शहरात पावसाचा जोर ओसरला आहे. ढगाळ वातावरण असले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. चार दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy