मुंबई : नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यावर भाष्य केलं आहे. तिथं येणाऱ्या अनुयायांच्या किंवा इतर कुणाच्याही पार्किंगची अडचण नाही. पण या जागेचं व्यावसायिकरण केलं जात आहे, हे योग्य नाही. आम्ही आंदोलकांच्या सोबत आहोत, असं आंबेडकर म्हणाले.
लोकभावना पाहून नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगला स्थगिती देण्यात येत आहे. स्मारक समितीशी चर्चा करून सरकारने आराखडा तयार केला होता. मात्र आता त्याला स्थगिती देण्यात येत आहे. त्यामुळे स्मारक समितीशी चर्चा केल्यानंतर या बाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यांच्याशी चर्चा करून मगच त्याचं पुढचं काम करण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले.
नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बौद्ध अनुयायी यांना विश्वासात न घेता श्रद्धास्थानाला धक्का लावण्याचं काम सुरू आहे. नको ते करायला जाता कशाला….? ताबडतोब काम थांबवा. दिक्षाभूमीला डिसर्टब करु नका. तुम्हाला काय करायच ते तुम्ही कस्तुरचंद पार्कमध्ये जाऊन करा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी यावर भाष्य केलं. पार्किंगमध्ये किती गाड्या पार्क होणार? त्या ठिकाणी खरंच दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगची आवश्यकता आहे का? हा लोक भावनेचा विषय आहे. सरकार या विषयी सभागृहात माहिती सादर करणार आहे का?, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापला आहे. जाळपोळ अन् तोडफोड केली जात आहे. दरम्यान या ठिकाणी पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.
नागपुरातील दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगचा मुद्दा तापला आहे. भूमिगत पार्किंगमुळे स्तुपाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे या पार्किंगला आंबेडकरांच्या अनुयायांचा विरोध आहे. समाजकंटकांकडून बांधकामाची तोडफोड करण्यात आली आहे. स्मारक समितीची बैठक होणार होती. मात्र ती रद्द करण्यात आली आहे.
दीक्षाभूमी परिसरात भूमिगत पार्किंगला काही संघटनांकडून विरोध केला जातोय. आज कार्यकर्त्य आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय.
