सातारा : 22 महाराष्ट्र एन.सी.सी बटालियन सातारा यांच्या वतीने दिनांक 18 जून ते 27 जुन 2024 या कालावधीमध्ये आयोजित केलेल्या वार्षिक प्रशिक्षण शिबीर (अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प) नुकतेच महागांव तालुका सातारा येथे संपन्न झाले.
यावेळी शाहुनगर गोडोली सातारा येथील गुरूकुल स्कूलच्या एनसीसी कॅडेट्सना या सीएटीसी कॅम्पमध्ये आयोजित केलेल्या विविध स्पर्धेच्या प्रकारात एकुण 5 पारितोषिके मिळाले.
यामध्ये बेस्ट स्कूल, बेस्ट ड्रील गर्ल्स परेडमध्ये प्रथम , बेस्ट ड्रील बॉयस् परेडमध्ये प्रथम, साँग कल्चरल मध्ये प्रथम अशी विविध प्रकारात उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या गौरवात भर घातली. तसेच कॅम्प सिनियर म्हणून 229 मुलींचा कॅम्प सक्षमपणे संभाळल्याबद्दल कॅडेट सौम्या पिसेला मेडल मिळाले व क्वार्टर गार्ड व बेस्ट कॅडेट ऑफ कॅम्पचे मेडल कॅडेट ईशिता झोरे हिला मिळाले व क्वार्टर मास्टरचे मेडल कॅडेट हर्शल कवासे याला मिळाले.
यावेळी सर्व कॅडेसचे गुरूकुल एज्युकेषन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव आनंद गुरव, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा कदम, उपमुख्याध्यापिका सौ. सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, यांनी यावेळी अभिनंदन केले.
एकुण 10 दिवस आयोजित केलेल्या प्रशिक्षणामध्ये पिटी, ड्रील, वेपन ट्रेनिंग, मॅप रिडींग, फिल्ड क्राफ्ट, ब्याटल क्राफ्ट, फायरिंग याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सातारा जिल्हयातील 32 शाळामधून 229 मुली, 296 मुले अशी एकुण 525 कॅडेटनी प्रशिक्षण घेतले.
यावेळी बोलताना गुरूकुल एज्युकेषन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या उपक्रमाबरोबरच इतर क्षेत्रात सुध्दा विदयार्थी उज्वल कामगिरी करत आहेत. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे उद्दिश्ट आहे. एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये जे उल्लेखनीय यश संपादन केले याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. यासाठी सर्व शिक्षक व पालक यांचे योगदान महत्वाचे ठरत आहे.
एनसीसी प्रशिक्षणा वेळी कॅडेटसला कमांडिंग ऑफिसर कर्नल एम.ए.राजमन्नार सेना मेडल, सुभेदार मेजर सतीश तापसे, सुभेदार संभाजी शिंदे, सुभेदार दिपक शिंदे, सुभेदार आनंद कुमार, गुरूकुल स्कूलच्या एनसीसी ए.एन.ओ सौ. मेघा तपासे, ड्रील इन्स्ट्रक्टर दत्तात्रय येवले यांनी मार्गदर्शन केले.
यश प्राप्त केलेल्या एनसीसी कॅडेटसला अर्जुन चोरगे, मधुकर जाधव, नितीन माने, संजय कदम, जगदिश खंडेलवाल, अंबाजी देसाई, उदय गुजर, दिपक मेथा, हरिदास साळुंखे, राजेंद्र खंडेलवाल, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
