Explore

Search

April 13, 2025 11:06 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Bollywood News : आजोबा टायगर पतौडींच्या पावलांवर तैमुरचं पाऊल

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मोठा मुलगा तैमुरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तैमुर क्रिक्रेट खेळताना दिसतोय. यावेळी त्याच्यासोबत त्याचे वडील सैफसुद्धा उपस्थित आहे. एका व्हिडीओमध्ये तैमुरला त्याचे प्रशिक्षक क्रिकेट खेळण्याविषयी प्रशिक्षण देताना पहायला मिळत आहे. तर दुसऱ्यामध्ये सैफ त्याच्या पतौडी कुटुंबाच्या क्रिकेटचा इतिहास मुलाला सांगताना दिसतोय. सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे सुद्धा भारतीय क्रिकेटर आणि भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार होते.

इंटरनॅशनल क्रिकेट मास्टर्स युकेकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये सैफ तैमुरला परगण्यांच्या संकल्पनांविषयी समजावून सांगताना दिसतोय. तो म्हणतो, “परगण्या या क्लबसारख्या असतात. ससेक्स, वूस्टरशर यांसारखे ते क्लब्स असतात. तुझे पणजोबा वूस्टरशरसाठी खेळायचे तर तुझे आजोबा ससेक्ससाठी खेळायचे.” सैफ आणि तैमुर हे लंडनमध्ये आहेत. लॉर्ड्स कॉम्प्लेक्समध्ये आठ वर्षीय तैमुरने नेट क्रिकेट खेळण्याचाही आनंद घेतला. यावेळी तैमुरने बॉलिंग केली तर सैफने बॅटिंग केली. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तैमुरसुद्धा त्याच्या आजोबा आणि पणजोबांच्या पाऊलांवर पाऊल टाकत क्रिकेट क्षेत्रात करिअर करणार, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रात सैफ अली खानच्या कुटुंबीयांचा मोठा इतिहास आहे. सैफने आई शर्मिला टागोर यांच्या पावलांवर पाऊल टाकत अभिनयक्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. तर सैफचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे टायगर पतौडी म्हणूनही ओळखले जायचे. ते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. बीसीसीआयकडून त्यांचा सीके नायुडू लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला होता. सैफचे आजोबा इफ्तिखर अली खान पतौडी हे सुद्धा 1946 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते.

सध्याच्या घडीला देशभरात क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जितकी क्रेझ आहे, तितकीच क्रेझ एकेकाळी अभिनेत्री शर्मिला टागोर आणि दिवंगत क्रिकेटर टायगर पतौडी यांच्याविषयी होती. शर्मिला यांनी दिग्गज क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न केलं होतं. मॅचनंतरच्या पार्टीदरम्यान या दोघांची एकमेकांशी भेट झाली होती. 27 डिसेंबर 1968 रोजी या दोघांनी लग्न केलं होतं. शर्मिला आणि टायगर यांना सैफ अली खान, सबा अली खान, सोहा अली खान ही तीन मुलं आहेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy