सातारा : सातारा जिल्हयात पश्चिमेकडील पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा, कराड या तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे संभाव्य पूर परिस्थिती, दरड कोसळणे अन्य दुर्घटनांना तात्काळ प्रतिसाद देणे आणि शोध व बचाव कार्य सुनियोजित पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात १ जुलै २०२४ रोजी एन डी आर एफ चे पथक दाखल झाले आहे.
या पथकासोबत एकुण ३० व्यक्ती असुन २ पोलिस निरिक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. सदयस्थितीत सदरचे पथक कराड येथे तैनात करण्यात आलेले आहे. सदर पथकासमवेत आवश्यक यंत्र सामुग्री व तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध आहे. जिल्हयात कोठेही आपत्ती जनक परिस्थिती उदभवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सदरचे पथक सज्ज ठेवणेत आलेले आहे.
पथकातील टिम कमांडर सुजित पासवान तसेच निरीक्षक राजेंद्र कांबळे व पथकातील सदस्यांचे स्वागत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपविभागिय अधिकारी कराड अतुल म्हेत्रे तसेच कराडचे प्रभारी तहसिलदार चंद्रशेखर शितोळे यांनी केले.
