Explore

Search

April 19, 2025 5:00 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Dhangar Reservation : धनगर समाज एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला

बीड : मागच्या काही दिवसांपासून राज्यामध्ये आरक्षणावरुन वाद उभा राहिला आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरु झालाय. त्यातच मागील महिन्यात लक्ष्मण हाके यांनी ओबीसींच्या हक्कासाठी लढा उभा केल्याने परिस्थिती बिघडली होती.

लक्ष्मण हाके यांनी सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीविरोधात आंदोलन केलं होतं. याशिवाय कुणबी प्रमाणपत्र वाटपात गैरव्यवहार होत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला होता. मात्र आता धनगर समाज एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे.

गुरुवारी राज्यभर धनगर बांधवांनी रस्त्यावर मेंढ्या उतरवत आंदोलन पुकारलं आहे. बीडमध्ये मागच्या पाच दिवसांपासून धनगर बांधवांचं उपोषण सुरु आहे. समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीने आता जोर धरला आहे.

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, ही मागणी घेऊन बीडमध्ये धनगर समाज बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे. बीड शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये आकाश निर्मळ यांच्यासह धनगर बांधवांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

मागील पाच दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू असून अद्यापपर्यंत प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. मागच्या तीस वर्षांपासून धनगर बांधवांची एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी आहे. मात्र सरकारने याबाबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही, असा पवित्रा बीडमधील उपोषणकर्त्या धनगर बांधवांनी घेतला आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy