Explore

Search

April 5, 2025 1:01 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Lifestyle : नात्यामधील बॉन्डिंग कसे असावे?

कोणतेही नाते तयार व्हायला एक वर्ष लागले तर ते टिकवायला एक अख्य आयुष्य लागतं. अनेकदा असे आढळून आले आहे की, जोडपी नवीन नातेसंबंधात खूप आनंदी असतात. ते सर्व अपेक्षांवर अवलंबून असतात जोडीदार त्यांच्यासाठी सर्व गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जसजसा वेळ जातो तसतसे एकमेकांच्या चुका दिसू लागतात. त्यामुळे नात्यात भांडणं होऊ लागतात.

अशी स्थिती निर्माण झाल्यानंतर एकमेकांना आनंदी ठेवणे सोपं काम नाही. या वादांमुळे नातं तुटण्याची भीती मनात घर करू लागते आणि चिंता वाढू लागते. पण मनात शंका घेण्याऐवजी किंवा भीती निर्माण करण्याऐवजी तुमच्यातील बॉन्डिंगवर लक्ष केंद्रित केले तर नातं अधिक घट्ट होईल. तुमच्यातील बॉन्डिंग कसं आहे, हे जाणून घेणं खूप आवश्यक असतं, हे जाणून कसं घेता येईल हे आपण खालील गोष्टींतून समजून घेऊ.

जोडीदारासोबतचे तुमचे नातं कसं आहे, हे कसं ओळखावं

जर तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर न डगमगता तुमच्या भावना व्यक्त करू शकत असाल आणि कोणालाही वाईट वाटले नाही, तर तुमच्यातील बॉन्डिंग चांगले आहे. तुम्ही एकमेकांचा कमकुवतपणा ओळखून आहात. तरीही तुम्ही त्यावर टोमणा न मारता समजून घेत आहात. किंवा भांडणं करत नाहीत, तर तुमचं नातं घट्ट असल्याचं समजून घ्यावं.

तुम्ही जेव्हा एकमेकांच्या चुका तु्म्ही समजून घेत आहात. त्या चुकांवर एकमेकांना दोष न देता त्यावर उपाय शोधत असला तर तुमचं नातं चांगलं मजबूत झालंय हे समजून घ्यावं. बऱ्याचवेळा स्पर्श केल्यावरुनही तुमचं नातं मजबूत आहे की दिखावा आहे. हे समजून येतं. जेव्हा तुम्ही कोणताच संकोच न बाळगता एकमेकांना मिठी मारता किंवा किस करतात तर तुमचं नातं चांगलं असल्याचं म्हटलं जातं. डोळ्यात डोळे घालून तुम्ही जेव्हा एकमेकांशी संवाद साधत असतात तेव्हा तुमच्या नात्यात विश्वासहर्ता येते आणि नातं घट्ट होत असतं.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy