Explore

Search

April 19, 2025 4:59 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Ashadhi Wari : वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरु असताना अचानक सिलेंडरने  घेतला पेट

पुणे : आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे निघाले आहेत. अशात सासवड जवळ एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरु असताना अचानक घरगुती सिलेंडरने पेट घेतल्याची घटना घडली. तिथे असलेल्या वारकऱ्यांनी वाळू मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पालखीमध्ये बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन वाहनास संपर्क साधण्यात आला. पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचत जवानांनी पेटलेला सिलेंडरवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणत मोठा अनर्थ टाळला.

अशात आज सकाळी सुमारे 10 वाजता सासवड – जेजुरी रस्ता, वाळुंज फाटा या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गस्थ होत असताना पुढे दिंडी क्रमांक 78 मधील वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरु असताना ही घटना घडली. पुणे अग्निशमन दलाचे वाहन गेली कित्येक वर्ष आळंदी ते पंढरपुर माऊलींच्या सुरक्षतेकरिता तसेच आग व आपत्कालिन परिस्थितीत तातडीने मदत मिळावी म्हणून अग्निशमन अधिकारी व जवानांसह तैनात असते. इतर महानगरपालिका, पीएमआरडीए व नगरपालिका व इतर अग्निशमन वाहनेदेखील बंदोबस्ताकरिता असतात. आज घडलेल्या घटनेमुळे पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने उपस्थित वारकरी समुदाय यांनी जवानांचे आभार मानले. पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी ही अधिकारी व जवानांचे कौतुक केले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy