Explore

Search

April 19, 2025 11:38 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Mazi Ladaki bahin Yojana : जिल्हा बॅंकेत महिलाकरीता ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण

झिरो बॅलन्स्’ (शुन्य बाकी) खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा !

सातारा : मा. नितीन पाटील, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सातारा. महाराष्ट्र राज्य सरकारने विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु २.५० लाखापेक्षा जास्त नाही अशा महिलाकरीता ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ ही योजना शासनामार्फत सुरु करणेत आलेली आहे .

सदर योजनेचे स्वरुप : पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण बँक खात्यात दरमहा रुपये १५००/- इतकी रक्कम पात्र महिलेस देणेत येईल. या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र राहतील . यासाठी लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे .

महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा लाभ जिल्हयातील सर्व पात्र महिलांना मिळणेसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या महिलांची ‘झिरो बॅलन्स्’ (शुन्य बाकी) खाती बँकेच्या सर्व शाखांमध्ये तात्काळ उघडून घेणेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे . हे खाते उघडणेसाठी महिलांचे खाते उघडणेचा फॉर्म , २ फोटो, आधार कार्डची प्रत इ. कागदपत्र आवश्यक राहतील .

जिल्हयातील बँकेच्या  ३०७ शाखा व १२ विस्तारीत कक्षाद्वारे ग्राहकांची सेवा बँक करीत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिव्हाळ्याची सेवा देण्यास सदैव तत्पर आहे. बँकेचे सर्व ठेवीवरील व्याजदर अत्यंत आकर्षक असून रू. ५ लाखापर्यंतचे सर्व ठेवींना विमा संरक्षण आहे. बँकेने कर्ज वसूलीचे कामकाज सातत्याने प्रभावशाली केलेने गत १७ वर्षे बँकेच्या निव्वळ अनुत्पादक कर्जाचे (एनपीए) प्रमाण शून्य टक्के राखले आहे.

बँकेच्या कामकाज अनुषंगाने मा .आ .श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा .आ.          बाळासाहेब पाटील, मा.आ.श्रीमंत छ.शिवेंद्रसिहराजे भोसले, मा. खा. श्रीमंत                     छ .उदयनराजे भोसले, मा.आ. मकरंद पाटील यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभत आहे. बँकेने जिल्हयातील ग्राहकांना सर्वात कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेणेसाठी ‘झिरो बॅलन्स्’ (शुन्य बाकी) खाती आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन उघडून घेणेसाठी बँकेच्या नजिकचे शाखेमध्ये संपर्क साधावा.

जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी बँकेने ठेवी व कर्जाच्या अनेकविध योजना आखल्या असून, त्यास जिल्हयातून चांगला प्रतिसाद प्राप्त होत आहे. तेंव्हा आजच महिलांनी ‘झिरो बॅलन्स्’ (शुन्य बाकी) खाती उघडून घेणेसाठी बँकेच्या नजीकचे शाखेमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष, मा.नितीन पाटील, उपाध्यक्ष मा. अनिल देसाई,  मुख्य कार्यकारी अधिकारी  मा .डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy