Explore

Search

April 12, 2025 8:43 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : जावळी तालुक्यातील कुडाळ येथील क्रीडा संकुलाबाबत क्रीडा मंत्र्यांची सकारात्मकता

कुडाळ : जावळी तालुक्यातील गेल्या दहा वर्षापूर्वी मंजूर झालेला तालुका क्रीडा संकुलनाला (Sports Complex) खर्‍या अर्थाने पुन्हा एकदा निधी (Fund) मंजूर होऊन क्रीडा संकुलन होण्याचा मार्ग मोकळा होऊ लागला आहे. कुडाळ ग्रामपंचायतीचा प्रस्ताव (Proposal) महाराष्ट्र राज्य क्रीडा मंत्री (Maharashtra State Sport Minister) बनसोडे यांच्याकडे गेला असून लवकरच जावळी तालुका क्रीडा संकुल कुडाळ येथे होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. याबाबतचा प्रस्ताव आणि निवेदन अजितदादा पवार गटाचे कट्टर समर्थक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम (Amitdada Kadam) व कुडाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सोमनाथ कदम, सागर भोगावकर यांनी याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये क्रीडा मंत्री बनसोडे यांची भेट घेऊन ग्रामपंचायतीने दिलेला क्रीडा संकुलाचा प्रस्ताव सादर केलेला आहे. तसेच याबाबत निवेदन देखील दिले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कुडाळ येथे तालुका क्रिडांगणास मंजूरी मिळण्याकरिता स्थानिकांना विचारात घेऊन त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. त्या प्रसंगी सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम, सरचिटणीस निवास शिंदे, कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम, राष्ट्रवादीचे सागर भोगावकर आदी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान जावली तालुक्यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष आहेत. क्रीडा संकुलनाच्या जागेवर अतिक्रमणामध्ये असणारे कुडाळ येथीलच ग्रामस्थांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या जमिनीचे पुनर्वसन व त्यांना योग्य त्या पद्धतीने जागा उपलब्ध करून मिळाली पाहिजे, याबाबत देखील एका ग्रामपंचायतीचा प्रस्ताव दिला गेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये झालेल्या विशेष ठरावावर माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, उपसरपंच सोमनाथ कदम यांनी याबाबत पुढाकार घेतला असून आगामी काळात ना. अजितदादा पवार व स्थानिक यांच्यात समन्वय साधून कुडाळ क्रीडा संकुलाच्या जागेवर असणार्‍या घरांचा व स्थानिक ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा विचार घेऊनच हा प्रस्ताव व अंतिम क्रीडा संकुल होण्याच्या दृष्टिकोनातून ठोस पावले टाकली जातील, असे देखील उपसरपंच सोमनाथ कदम यांनी सांगितले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy