Explore

Search

April 19, 2025 5:00 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Sant Tukaram Maharaj Palkhi : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकरी आरोग्य शिबिराचं इंदापूरला आयोजन

विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा उपक्रम

सातारा : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रच्या सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्यावतीने वारकरी आरोग्य तपासणी शिबिर यंदा दहाव्या वर्षीही  आयोजित करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात इंदापूर येथील श्रीराम मंदिर आवारात दि.10 जुलै रोजी मोफत वारकरी आरोग्य तपासणी शिबीर वारी समतेची या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलं आहे. या आरोग्य शिबिरात साताऱ्यातील डॉक्टर आणि चळवळीचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक  चळवळीचे उपाध्यक्ष विजय मांडके आणि प्रा.गौतम काटकर यांनी सांगितली.

पुण्यातून  पुढं गेल्यानंतर  वारकऱ्यांना आरोग्य विषयक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळं विद्रोही सांस्कृतिक चळवळ गेल्या नऊ वर्षांपासून इंदापूर, (जिल्हा पुणे) येथे मोफत वारकरी आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करत आहे. या आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनासाठी आर्थिक मदत आणि औषधं गोळा करण्याचं काम विद्रोहीच्या कार्यकर्त्यांकडून सुरु आहे.

इंदापूर येथील विविध पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते हे रमेश शिंदे, साथी सलीम शेख यांच्या सहकार्यातून हे शिबिर आयोजित करण्यासाठी सहकार्य करत असतात.

वारकरी परंपरा ही समतेची परंपरा आहे.जातीभेद, स्त्री-पुरुष विषमता न मानणारी परंपरा आहे. मध्ययुगात ज्ञानाची मक्तेदारी मोडून बहुजनांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारी वारकरी परंपरा ही विद्रोही परंपरा आहे. त्यामुळे वारीसाठी येणारे वारकऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे या भावनेतून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करत आहोत, अशी माहिती विद्रोही सांस्कतिक चळवळीच्या वतीनं देण्यात आली.

दरम्यान,विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्रच्या वतीने गेली २० वर्षांपासून जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसाठी चिंचणी टप्पा, जिल्हा सोलापूर येथे वारकरी आरोग्य तपासणी शिबीर (दवाखाना) चालवतो.

वारकऱ्यांना तज्ज्ञ डॉक्टर तपासून औषधे दिली जातात. . या आरोग्य शिबिरात साताऱ्यातील डॉक्टर आणि चळवळीचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक  चळवळीचे उपाध्यक्ष विजय मांडके  आणि प्रा.गौतम काटकर यांनी सांगितलं.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy