बद्रीनाथ : उत्तराखंडमधून भूस्खलनाचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे, तो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. बुधवारी उत्तराखंडमधील चमोली येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. पातळगंगा लंगसी बोगद्याजवळ ही भयानक भूस्खलनाची घटना घडली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चमोली जिल्ह्यातील पाताळ गंगा परिसरात ही मोठी भूस्खलन झाली असून 37 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये डोंगराचा मोठा भाग तुटून महामार्गावर पडताना दिसतोय. एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये, डोंगराचा एक मोठा भाग कोसळून महामार्गावर पडतो, दोन्ही बाजूला लोक दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये डोंगराचा मोठा भाग तुटून रस्त्यावर पडताना दिसत असून यामुळे राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे
घडनास्थळाची दृश्य इतकी विचलित करणार होती, की प्रत्यक्षदर्शींनी आपण साक्षात काळ पाहिल्याचं म्हटलं. प्रचंड आवाज होऊन एका क्षणात आसमंताला गवसणी घालणारा डोंगरकडा कधी खाली कोसळला हेच अनेकांच्या लक्षात आलं नाही. त्यानंतर फक्त गोंधळ, भीतीपोटी फुटलेल्या किंकाळ्या आणि धुळीचे प्रचंड लोट इतकंच काय ते घटनास्थळी पाहायला मिळालं. डोंगरकडा कोसळून घडलेल्या या घटनेनंतर एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि निसर्गाच्या या रौद्र रुपानं सर्वांना धडकी भरवली.
